
- पिंपरी चिंचवडचे निवडणूक प्रमुख सचिन भोसले राष्ट्रवादीत
पिंपरी चिंचवड शहरातल भाजप, शिवसेना शिंदे आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांच्या रथीमहारथींना अजित पवार यांनी जोरदार धक्का दिला. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी शहर प्रमुख आणि आताचे भोसरी, पिंपरी, चिंचवड या तीनही विधानसभांचे निवडणूक प्रमुख सचिन भोसले यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी शहराध्यक्ष नाना काटे, माजी नगरसेवक कैलास बारणे आदी उपस्थित होते
दरम्यान, प्रवेशाबद्दल भोसले म्हणाले, मला आजवर ठाकरेंच्या शिवसेनेनेच मोठे केले, त्यांचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. शिवसेनेवर माझा बिलकूल राग नाही. मला ज्यांनी त्रास दिला त्यांना मला धडा शिकवायचा आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी माझी एकच अट होती की खासदर श्रीरंग बारणे यांच्या चिरंजीवाच्या विरोधात उमेदवारी मिळावी आणि ती अजितदादांनी मान्य केली. मी पदमजी पेपर मिल प्रभाग क्रमांक २४ मधून लढणार आहे. गेल्यावेळी २०१७ मध्ये भाजप उमेदवार जयदिप माने यांचा हजार मतांनी मी पराभव केला आणि ८९४७ मते घेतली होती. आता पुन्हा महापालिका सभागृहात यायचेच असा निश्चय आहे.