अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या आवारात कोयता गँगचा हैदोस

0
314

गेल्या काही महिन्यांपासून शहरात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगने (Koyta Gang)पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे बोलले जात आहे. कारण बुधवारी दुपारी कोयता हातात घेऊन लोहगाव (Lohegaon)येथील अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या (Ajinkya DY Patil University)आवारात कोयता गॅंगने धुमाकूळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल (Viral video)झाला आहे.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासूनच सुरक्षा व्यवस्था तैनात असताना कोयता घेऊन दहशत पसरवणारे गुंड विद्यापीठात येतात कसे.विद्यार्थ्यांच्या दिशेने कोयता फिरवतात कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या कॅम्पसवरील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे.  

आत्तापर्यंत कोयता गँग नागरी वस्तीत दहशत पसरवत असल्याचे निदर्शनास आले होते.मात्र एखाद्या शैक्षणिक संकुलाच्या आवारात कोयता घेऊन हल्ला करण्याची ही  पहिलीच घटना समोर आली आहे.याबाबत अजिंक्य डी.वाय.विद्यापीठाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.

पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.मात्र, गुरूवारी कोयता घेऊन विद्यापीठ आवारात फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबतचा अधिक तपास सुरू केला आहे.तसेच चौकशी करून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.