अजिंक्यपद कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी राठोड व गोरे यांची निवड

0
366

दापोडी दि. ९ (पीसीबी) :   बिहार पटना येथे १ ते ४ आगस्ट कालावधीत होणाऱ्या ४८ व्या राष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी थेरगाव येथील क्रीडा कला विकास प्रकल्प पिंपरी चिंचवड मनपा कबड्डी संघाच्या मनीषा राठोड व भूमिका गोरे यांची निवड झाल्याबद्दल महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांचे शुभहस्ते आयुक्त दालनात त्यांचा सत्कार करण्यात आला. व पुढील स्पर्धेस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

महानगरपालिकेच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाने नेहरू स्टेडियम पुणे येथे संपन्न झालेली ४८ वी जिल्हास्तर कुमारी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धा जिंकली. सदर संघातील मनीषा राठोड, भूमिका गोरे व शिफा वस्ताद यांची पुणे जिल्ह्याच्या संघात निवड झाली. दरम्यान बालेवाडी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तर निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुणे जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळविला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त क्रीडा विठ्ठल जोशी, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, डॉ.अशोक कोल्हे, थेरगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम, क्रीडा मार्गदर्शक बन्सी आटवे आदी उपस्थित होते.
मी स्वतः विद्यापीठ कबड्डी खेळाडू असून आपल्या शहराचा कबड्डी क्षेत्रात नावलौकिक वाढविल्याबद्दल तुमचे अभिनंदन. भारतीय कबड्डी संघात भविष्यात खेळण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!”असा मनोदय आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केला.

मनीषा राठोड व भूमिका गोरे यांची निवड झाल्याबद्दल महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांचे शुभहस्ते आयुक्त दालनात त्यांचा सत्कार करण्यात आला.