दि .7 (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चढवण्यात येणारी चादर घेऊन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमेर जेतपुरवाला आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.
राजस्थानच्या अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या कबरीवर दरवर्षी जगभरातील विविध धर्माचे लोक मोठ्या श्रद्धेने चादर चढवतात. यंदा या उरुसाचे ८१३ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पक्षाच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यात चादर चढवली जाणार आहे. या चादरीला हात लावून ती मोठ्या श्रद्धेने अजमेरकडे रवाना करण्यात आली.