अग्रवालचे भयंकर कारनामे उजेडात, महिलेची १० एकर जमीन हडपल्याची तक्रार

0
284

पुणे : कल्याणीनगरमधील पोर्शे कार दुर्घटनेतील कारचालकास बालसुधारगृहात टाकल्यानंतर आता अग्रवाल कुटुंबीयांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. पुणे कार अपघातप्रकरणी आजोबा, बाप आणि नातू तिघेही तुरुंगात असताना आता त्यांच्या गुन्हेगारीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. पुण्यातील नामवंत बिल्डरच्या यशोगाथेमागची काळी कहानी या घटनेनंतर उजेडात आली आहे. पोराचं अपघात प्रकरण दाबण्यासाठी अग्रवाल पिता-पुत्राने कशारितीने शासकीय यंत्रणेवर, पोलिसांवर दबाव टाकला, पैशाचं आमिष दाखवलं हे समोर आलं. त्यानंतर, संबंधितांवर कारवाईही झाली. आता, अग्रवाल यांनी एका महिलेच्या 10 एकर जमिनीवर बेकायदा ताबा घेतल्याचे उघडकीस आले आहे.

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी ससूण रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलल्याचे पोलीस तपासातून पुढे आले. त्यानंतर, पोलिसांनी दोन डॉक्टरांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अग्रवाल कुटुंबीयांकडून फसवणूक झाल्याची किंवा त्रास दिला गेल्याची आणखी दोन प्रकरणे पुढे आले आहेत. काही दिवसांपूर्वी सुरेंद्र अग्रवालचे दाऊदच्या निकटवर्तीयाशी संबंध असल्याचे समोर आले होते. त्यानंतर, यांच्या कारनाम्याच्या अनेक कथा समोर येत आहेत. आता, वडगाव शेरी येथील एका महिलेने अग्रवाल कुटुंबीयांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.

शिवसेना नेते अजय भोसले यांनी पुढे येत यापूर्वी अग्रवाल कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, आणखी एक तक्रारदार पुढे आले आहेत. दत्तात्रय कातोरे अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार आहेत. आपल्या मुलाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारदार दत्तात्रय कातोरे यांनी केला आहे. तर, आता एका महिलेने पुढे येऊन अग्रवाल कुटुंबीयांवर जमिन हाडपल्याचा आरोप केला आहे. वडगाव शेरी भागातील नीता गलांडे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात येऊन अग्रवाल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गलांडे यांच्या 10 एकर जागेवर अग्रवाल कुटूंबाने बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे. तसेच, याबाबत पोलिसांत तक्रार करुनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.

ब्रम्हा बिल्डर्स कंपनीकडे दत्तात्रय कातोरे 2000 ते 2005 दरम्यान खोदाईचं काम करत होते. काम पूर्ण झाल्यानंतरही कातोरेंना अग्रवाल बिल्डर्सकडून पैसे देण्यात आले नव्हते. कातोरेंना अग्रवालांकडून तब्बल 84 लाख 50 हजार रुपयांचं येणं होतं. सातत्यानं पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्यामुळे तक्रारदार दत्तात्रय कातोरेंचा मुलगा शशी कातोरे ह्याने जानेवारी महिन्यात आत्महत्या केली. याप्रकरणी आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडील दत्तात्रय कातोरे यांनी आज पोलिसांत येऊन तक्रार दिली आहे. त्यानंतर, आता वडगाव शेरीतील महिलेकडून तिसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दाऊद गँगमधील कुख्यांतांशी संबंध
ब्रह्मा बिल्डर्सच्या नावानं या अगरवाल कुटुंबांचा धंदा असला, तरी ते काळ्या कृत्यांमध्ये सहभागी असल्याचं आता समोर आलं आहे. विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचं त्यांच्या भावासोबत पटत नव्हतं. संपत्तीचा वाद होता. तेव्हा त्यांनी थेट छोटा राजनशी संपर्क साधला होता. त्यांचा उद्देश त्यावेळी साध्य झाला नाही, पण छोटा राजनबरोबर दोस्ती वाढली. छोटा राजनचा हस्तक विजय पुरुषोत्तम साळवी ऊर्फ विजय तांबटची बँकॉकला जाऊन भेटही घेतली होती. या दोस्तीतूनच सुरेंद्र अग्रवाल यांनी 2009 साली शिवसेना नेते अजय भोसलेंची सुपारी दिली होती. वडगाव शेरीत 2009 ची निवडणूक लढवताना भोसलेंवर गोळीबारही झाला