अखेर रवी लांडगे भाजपमध्ये

0
1

भाजप आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक रवी लांडगे यांचा आज भाजप प्रवेश झाला. ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा देत रवी लांडगे स्वगृही परतले. २०१७ मध्ये धावडेवस्ती प्रभागातून ते बिनविरोध जिंकले होते. लांडगे यांचे पिताश्री बाबासाहेब लांडगे हे भाजपचे नगरसेवक होते आणि दिवंगत माजी शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे ते सख्खे पुतणे होतं. शहरात भाजपचा विस्तार करण्यात या कुटुंबाचे मोठे योगदान असल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शहरातील माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्षांसह २२ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.