अखेर भिडेवाड्याचा निकाल महापालिकेच्या बाजुने

0
354

पुणे, दि. १६ (पीसीबी) : देशातील मुलींचा पहिली शाळा पुण्यातील ज्या वाड्यात सुरु झाली त्या भिडेवाड्याचा न्यायालयीनं प्रक्रियेत अडकलेला प्रश्न अखेर निकाली लागला आहे. भिडेवाड्या संदर्भातील सुप्रीम कोर्टातील खटला पुणे महापालिकेने आणि सरकारने जिंकला आहे. त्यामुळं आता लवकरच इथं या शाळेचं स्मारकात रुपांतर करण्याचं काम तातडीने काम सुरू करण्यात येणार आहे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.