अखेर निगडी येथील भुयारी मार्ग वापरासाठी खुला

0
284

नागरिकांच्या हस्ते झाले भुयारी मार्गाचे लोकार्पण

▪️ भुयारी मार्गामुळे अपघातास बसणार आळा

पिंपरी, दि. १० (पीसीबी) -निगडी प्रभाग क्र १३ गावठाण येथील भुयारी मार्गाचे उद्घाटन तेथील स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून भुयारी मार्ग करण्यात यावा अशी मागणी स्थानिक वर्ग, विद्यार्थी व व्यापारी वर्गाची होती. या नुसार महानगर पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून भुयारी मार्ग बनवण्यात आला.
हा भुयारी मार्ग होण्याआधी रस्ता ओलांडत असताना अनेक ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी वर्ग व महिलावर्ग यांचा अपघात झाला व तर अनेक अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. हे होणारे अपघात थांबावेत म्हणून महापालिकेकडून निगडी येथे भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले व काही दिवसांपूर्वी सदर पूल बांधून पूर्ण झाला होता. आज रोजी भुयारी मार्गाचे लोकार्पण झाल्यामुळे नागरिक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
निगडीतील या भुयारी मार्गामुळे नक्कीच अपघातास आळा बसणार आहे यामुळे येथील नागरिक समाधान व्यक्त करत आहे पालिका प्रशासन , व आयुक्त यांचे आभार मानतो लोकांचे हित पाहता यांनी हे काम पूर्ण करून दिले त्याबद्दल धन्यवाद!
या उद्घाटन प्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवनेकर, देवेंद्र निकम, चंद्रकांत उर्फ बाळ दानवले, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी काळभोर, मारुती भापकर , राजेंद्र काळभोर ,मधुराज पवळे , रोहीत काळभोर , मंगेश काळभोर , सागर सोनटक्के , नजीर खाटीक व प्रभागातील जेष्ठ नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.