अखेर धोकादायक रॅम्प रद्द; मनसेचा यशस्वी पाठपुरावा!

0
25

पिंपरी, दि. 16 (पीसीबी) : सॉलिटर फ्लाम्स सोसायटी (मोशी) मधील 240 फ्लॅट धारकांची मागण्या ऐकून घेत बिल्डरकडून होणाऱ्या धोकादायक रॅम्पच्या कामाविरुद्ध मनसेचे शहर सचिव मनोज लांडगे व जयसिंग भाट शहर संघटक भोसरी यांनी आवाज उठवला होता. याचीच दखल घेत अखेर बिल्डरकडून धोकादायक रॅम्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या सविस्तर वृत्त असे की, मोशी विभागात सॉलिटर फ्लाम्स सोसायटी येथे बिल्डरकडून रॅम्प उभारला जाणार होता.

हा रॅम्प अत्यंत धोकादायक असल्याचा आरोप करीत सोसायटीत राहणाऱ्या 240 फ्लॅट धारकांनी मनसेचे शहर सचिव मनोज लांडगे व शहर संघटक भोसरी जयसिंग भाट यांची भेट घेत संपूर्ण प्रकार त्यांच्यासमोर मांडला. यावेळी सोसायटीधारकांच्या समस्या व मागण्या ऐकून घेत मनोज लांडगे व जयसिंग भाट यांनी सदरील प्रकरणी संबंधित बिल्डरकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली, तसेच सोसायटी समोरील धोकादायक रॅम तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला. अखेर मनसेच्या आक्रमक क पावित्र्याची दखल घेत बिल्डरकडून धोकादाय रॅम्प रद्द करण्यात आला. यावेळी सोसायटी धारकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.