अखेर गँगस्टर शरद मोहोळचा अंत

0
2111

पुणे, दि. ०५ (पीसीबी) – पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरुड परिसरात गोळीबार करण्यात आलाय. शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुंड शरद मोहोळ याच्यावर झालेला हा जीवघेणा कुणा केला ? हा हल्ला एखाद्या टोळीने अथवा पूर्ववैमन्यस्यातून झाला का? याची अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहे.

शुक्रवारी भरदुपारी कोथरुडमध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली. कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरु केली आहे.

पूर्ववैमन्यास्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गोळीबार झाल्यानंतर कोथरुड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेय. शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याप्रकरणात तो जामिनावर बाहेर आला होता. पण दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केल्याप्रकरणात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्यावर अनेक गुन्ह्याची नोंद आहे. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळ याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते.