अखिल भारतीय पंधरावे स्त्री साहित्य कला संमेलन, डॉ. नीलम गोऱ्हे उद्घाटक

0
214

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – अखिल भारतीय पंधरावे स्त्री साहित्य कला संमेलन उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गो-हे, स्वागत अध्यक्ष आशा लुंकड, विशेष अतिथी म्हणून मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाभल सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 16 मार्च 2024 रोजी निगडी आकुर्डी येथील ग दि माडगूळकर नाट्यगृहामध्ये संपन्न होणार आहे,

या संमेलनाचे आयोजन स्वानंद महिला संस्था ,अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स महिला शाखा ,यांच्या मार्गदर्शनाने प्रमुख संयोजिका स्वानंदच्या संस्थापिका अध्यक्षा ,साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया, स्वानंद महिला संस्थेचे अध्यक्ष शोभा बंब, सचिव सीमा गांधी यांनी आयोजन केले आहे.

यावेळी या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद ,संस्था गौरव समारंभ ,स्वानंद भरारी पुरस्कार ,कवी संमेलन, ग्रंथदिंडी पूजन-बदाम बाई बेदमुथा,प्रकट मुलाखत ,महिलांचे कलाविष्कार फॅशन शो आधी भरगच्च कार्यक्रमाने सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेसात या वेळेमध्ये संपन्न होत आहे.

या साहित्य संमेलनात प्रमुखाअतिथी म्हणून खासदार श्रीरंग बारणे ,खासदार डॉ मेधा कुलकर्णी, प्रसिद्ध उद्योजक प्रकाश धारीवाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, नेमीचंद चोपडा उद्योजिका, एडवोकेट सुनिता मुथा , दिना धारीवाल ,पल्लवी जैन, राजेश साकला, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक अशोक पगारिया, पारसजी मोदी, रमणलालजी लुंकड, अविनाशजी चोरडिया, पल्लवी जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समाजमान्य कार्यक्षम संस्था गौरव पुरस्कार

1)चिंचवड येथील जैन विद्या प्रसारक मंडळ
2)दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन
3) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चिंचवड शाखा
4) आखिल भारतीय श्री वर्धमान जैन स्वाध्याय संघ
5) सूर्य दत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट 6)गौतम स्मृती फाउंडेशन
7))नक्षत्राचे देणे काव्यमंच ,आदी संस्थांना गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्तनकार डॉक्टर श्वेता राठोड ,रेश्मा भंडारी करणार आहेत.
प्रकट मुलाखतीमध्ये मुलाखतकार साहित्यिक श्रीकांत चौगुले हे लावणी अभ्यासक रेश्मा मुसळे,ज्येष्ठ साहित्यिका मंजू लोढा,दीपस्तंभ मनोबल फाउंडेशनचे यजुर्वेद महाजन ,यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

स्वानंद भरारी पुरस्कार सावित्रीबाई महिला रत्न पुरस्कार आमदार उमा खापरे,समाज रत्न पुरस्कार बालोतरा नगरपालिका नगराध्यक्षा प्रभा संघवी, क्रियाशील समाज भूषण पुरस्कार एडवोकेट ललिता ओसवाल,कर्तव्यदक्ष सर्वपल्ली डॉ.राधाकृष्ण पुरस्कार डॉ. शितल भंडारी , बहिणाबाई साहित्य भूषण पुरस्कार ज्योती कानेटकर ,कार्यक्षम पत्रकारिता अशा साळवी ,कृतीशील शेतकरी कमल सातपुते, क्रीडाभूषण देशना नहार ,जैन जागृती संपादिका सुनंदा चोरडिया, आनंदीबाई जोशी वैद्यकीय सेवा डॉ अंजली देशपांडे,स्वाध्याय शिरोमणी वाणीभूषण प्रीती सुधाजीजी पुरस्कार पुष्पाबाई छाजेड, वीर हुलसा माता बिजा बाई कुसुम भंडारी आदर्श माता मदर तेरेसा सेवा पुरस्कार इत्यादींचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे, कार्यक्रम सूत्रसंचालन शितल बाफना, प्रियंका बोरा करणार आहेत.

निमंत्रित कवींच्या कवी संमेलनासाठी अनिल दीक्षित,राजेंद्र घावटे ,पितांबर लोहार ,प्रा. संपत गर्जे,दीपेश सुराणा , कल्पना बंब, वर्षा बालगोपाल, प्रा. सुभाष जैन ,वंदना इनान्नी ,वर्षा बालगोपाल, राजश्री बिनायकीया, संगीता झिंझुर्के, सुलभा सत्तुरवार, रश्मी कांकरिया, अनिता नहार आदी मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष राजन लाखे तर उद्घाटन पुरुषोत्तम सदाफुले करणार आहेत.कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ प्रियंका लूनावत व सीमा गांधी करतील

मिले सुर मेरा तुम्हारा हा स्वानंद ग्रुप व प्रयास ग्रुप चिंचवड कलाविष्कार सादर करणार आहेत , श्री आनंद मंगल फॅशन डिझायनर ग्रुप तर्फे फॅशन शो ,सरिता सखी मंच – लेझीम पथक, महाराष्ट्रातील संतांची परंपर डॉ. सुमेधा गाडेकर कार्यक्रम सादर करणार आहेत .
पसायदानाने कार्यक्रमाची सांगत होईल.