अखिल भारतीय नाट्य परिषदेवर एकमेव भाऊसाहेब भोईर बिनविरोध

0
656

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई च्या निवडणुकित उपाध्यक्षपदी पिंपरी चिंचवडचे जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. परिषदेची निवडणूक १६ मे रोजी असून एकमेव भोईर यांचीच निवड बिनविरोध झाली आहे.

राज्यातून पदाधिकारी निवड करायची असल्याने या निवडणुकिला महत्व आहे. अध्यक्षपदासाठी जेष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले विरोधात नवनाथ मच्छिंद्र कांबळी अशी लढत आहे. उपाध्यक्षपदासाठी दोन पदे असून एका पदासाठी नरेश सुमंतराव गाडेकर आणि अविनाश गोपाळ नारकर हे आमने सामने ठाकले आहेत. दुसऱ्या उपाध्यक्षपदार भोईर यांचा एकच अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.

कोषाध्यक्ष पदासाठी वीणा अजित लोकुरे आणि सतीश किसनराव लोटके हे दोन उमेदवार आहेत. प्रमुख कार्यवाह पदासाठी जगन्नाथ नाथा चितळे आणि अजित गोपिनाथ भुरे , तर सहकार्यवाह पदाच्या तीन जागांसाठी सहा उमेदवारांत समीर इंदुलकर, सुकन्या कुलकर्णी-मोने, दिलीप कोरके,अजय दासरी, सुनिल ढगे आणि एश्वर्या नारकर रिंगणात आहेत.

कार्यकारणी सदस्य पदाच्या ११ जागांसाठी १३ उमेदवारांमध्ये गिताबाली उनवणे, विजय चौगुले, संजय देसाई,गीतांजली ठाकरे, संदीप पाटील, गिरीश गौरीशंकर महाजन, सविता मालपेकर, संजय रहाटे, शंकर रेगे, सुशांत शेलार, विशाल शिंगाडे विजयकुमार साळुंके आणि दीपा क्षिरसागर असे उमेदवार आहेत.