अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने तयार केला बिल्डर विरुद्ध पोलिसांकडे करावयाचे तक्रारीचा नमुना

0
3

दि. २६ ( पीसीबी ) – नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने पुढे येऊन तक्रारी कराव्यात असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मार्फत बिल्डरने आपली फसवणूक केली असेल आणि आपणास बेकायदेशीर रित्या पार्किंग विकले असेल, आपल्याकडून लाईट मीटरचे पैसे रुपये १०००० पेक्षा जास्त घेतले असतील, सोसायटी करणेसाठी १००० रुपये पेक्षा जास्त रुपये घेतले असतील, एक वेळचे मेंटेनन्स पोटी काही पैसे घेतले असतील, सोसायटी स्थापन केली नसेल, सोसायटी चे नावाने खरेदी खत (convience deed) केले नसेल, आपल्याला जाहिरात (ब्रौशर, पॅम्पलेट, ऑनलाईन जाहिरात) केल्या प्रमाणे काही गोष्टी जसे क्लब हाउस, गार्डन, पोहण्याचा तलाव इत्यादी अमेनिटी दिल्या नसतील तर आपण पोलिसांकडे एफ आय आर कसा करावा याचा नमुना तयार केला आहे. तरी आपण याचा वापर करून जास्तीतजास्त गुन्हे दाखल करावेत आणि आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा.

काही ठिकाणी पोलिस गुन्हा दाखल करून घेत नाहीत तेव्हा सदर फॉरमॅट मधे आपण पोलिस स्टेशनला लेखी देऊन पोच घेतली तर तोच एफ आय आर म्हणून होऊ शकतो. तसेच नोंदणीकृत पोस्टाने देखील पाठवू शकतो. आपण आपल्या तक्रारीची प्रत सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस सुप्रिटेंडंट, पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक यांना देखील नोंदणीकृत पोस्टाने पाठवावी, जेणेकरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही तर कोर्टात तक्रार दाखल करताना उपयोगी पडेल. पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून घेतला नाही तर आपण सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस सुप्रिटेंडंट, पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक यांच्याकडे लेखी सदर पोलिस स्टेशन ची तक्रार दाखल करावी.

ललिता कुमारी केस मध्ये सुप्रीम कोर्टाने याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत की कोणताही व्यक्ती पोलीस स्टेशन मध्ये आला तर प्रथम गुन्हा दाखल करून घ्यावा असे आदेश दिले आहेत.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत
विजय सागर, पुणे ९४२२५०२३१५
बाळासाहेब औटी, मध्य महाराष्ट्र प्रांत ९८९०५८५३८४
डॉक्टर नारायण मेहरे विदर्भ प्रांत ७०३८३५८४६६
डॉक्टर विलास मोरे, देवगिरी प्रांत
राजेंद्र बंडगर, ठाणे कोकण ९९७५७१२१५३
अर्ज स्वीकारला नाहीत तर, १) नोंदणीकृत पोस्टाने सबंधित पोलीस ठाण्याला पाठवा.२) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोंदणीकृत पोस्टाने पाठवा. ३) तसेच सबंधित पोलीस ठाणे व जिल्हा पोलिस अधीक्षक/ पोलीस आयुक्त यांच्या ईमेलवर सुद्धा पाठवू शकता.
[email protected] ४) त्याची एक प्रत [email protected] या ईमेलवर पाठवा.

अर्जाची pdf मिळवण्यासाठी या लिंकवर मेसेज करा https://wa.me/917900040367

ईमेल: [email protected]
वॉट्सअप: 7900040367