’अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीची दहिहंडी फोडण्याचा मान मुंबईच्या चेंबूर येथील ‘शितलादेवी गोविंदा पथकास

0
1

दि . १८ . पीसीबी – पिंपरी चिंचवड शहरातील मानाची पारंपरिक दहिहंडी म्हणून ओळखली जाणारी माजी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवार आयोजित ’अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीची दहिहंडी फोडण्याचा मान मुंबईच्या चेंबूर येथील ‘शितलादेवी गोविंदा पथकास’ मिळाला.
या दहीहंडी महोत्सवाची सुरवात चिंचवडगावातीलच श्री छत्रपती शिवाजी उदय मंडळाच्या ‘शिवोदय’ या पारंपारिक ढोल ताशा पथकाच्या वादनाने झाली.

नवी मुंबई येथील गोविंद पथक, मुंबई चेंबूर मधील ‘शितळादेवी’ गोविंदा पथक, मुंबई गोवंडी येथिल ‘लुंबिनीबाग’ गोविंदा पथक येथिल गोविंदा पथकाने चित्तथरारक कसरंतीचे प्रदर्शन व स्पर्धा करीत सलामी देत प्रेक्षकांची मने जिंकली. शेवटी चेंबूरच्या ‘शितलादेवी’ गोविंदा पथकाने दहिहंडी फोडण्याचा मान मिळवला.
दहिहंडी महोत्सवाचे संयोजक अॅड. मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने स्मृतीचिन्ह व 5,55,555 रुपयांचे बक्षीस भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार अमितजी गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले व भाजपा जेष्ठ नेते पै.ज्ञानेश्वर आप्पा शेडगे यांच्या हस्ते गोविंदा पथकास देण्यात आले.

या दहिहंडी महोत्सवास सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनी हजेरी लावली यावेळी चिंचवड मधील तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती.
दरम्यान या महोत्सवात आवर्जून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जेष्ठ नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापूसाहेब काटे, विधान परिषदेच्या तालिका सभापती पदी निवड झाल्याबद्दल आमदार अमितजी गोरखे आणि चिंचवडचे सुपुत्र व मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निर्दोष मुक्तता झालेले राष्ट्रभक्त श्री समीरजी कुलकर्णी यांचा यावेळी दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आले.

याप्रसंगी टाटा मोटोर्स युनियन चे माजी अध्यक्ष व जेष्ठ भाजपा नेते पै.ज्ञानेश्वर शेडगे, समितीचे मार्गदर्शक दत्ताभाऊ चिंचवडे, बजरंग दल पुणे विभाग संयोजक कुणाल साठे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, राजाभाऊ गोलांडे, चंद्रकांत अण्णा नखाते, शितल शिंदे, राजाभाऊ दुर्गे, सुभाष चिंचवडे, हरिभाऊ तिकोने, भाजपा राज्य परिषद सदस्य पाटीलबुवा चिंचवडे, ब प्रभाग समिती सदस्य विठ्ठल भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे मा.अध्यक्ष अंबर चिंचवडे, भाजपा शहर मा.उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अजित कुलथे, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे, भाजपा जेष्ठ नेते रविंद्र देशपांडे, कामगार नेते हरीभाऊ चिंचवडे, भाजपा व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, चिंचवडचा राजा संत ज्ञानेश्वर मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलभाऊ सायकर, नव तरुण मंडळाचे अध्यक्ष सागर चिंचवडे, काळभैरवनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश लांडगे, जयहिंद सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष राहुल भोईर, संचालक बाळासाहेब लोंढे, सामाजिक कार्यकर्ते सोपानअण्णा चिंचवडे, आवेश चिंचवडे, चेतन चिंचवडे, योगेश चिंचवडे, सुनील लांडगे, दिपकआण्णा गावडे, धनंजय वीपट, कैलास गावडे, नानिक पंजाबी, स्वप्निल शेडगे, राघूशेठ चिंचवडे, नंदूकाका भोगले, अश्विन चिंचवडे, मनीष पंजाबी, राजन पाटील, राजन चिंचवडे, प्रथमेश रत्नपारखी, अमित चिंचवडे, हनुमंत हाके, अख्तर पिंजरी, लतीफ मुलानी, अतुल कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.