अंत्यसंस्काराची वेळ बदलली, सा.५.३० वाजता शेतात होणार अंत्यविधी.

0
689

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावार आज सायंकाळी साडेपाच वाजता पिंपळे गुरव येथील त्यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयाजवळील शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत. सुरवातीला अंत्यसंस्काराची वेळ सायंकाळी सात अशी दिली होती. आमदार जगताप यांना अखेरचा निरोप शासकिय इतमामात दिला जाणार असल्याने ही वेळ बदलण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.

चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कॅन्सरच्या आजाराने दीर्घ उपचाराअंती आज सकाळी दहा वाजता बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.