अंडी आणायला निघालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0
226

पिंपरी दि. २९ (पीसीबी) -मावस बहिणीसोबत अंडी आणण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 27) रात्री नेहरूनगर, पिंपरी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अतुल मोतीलाल पंडुरे (वय 52, रा. उद्यमनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी आणि तिची मावस बहीण अंडी आणण्यासाठी दुकानात जात होत्या. यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी, त्यांचा भाऊ आणि मुलगा गेले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.