अंगावर कुत्रे आल्याचा जाब विचारला म्हणून महिलेचा विनयभंग

0
183

चिखली, दि. ६ (पीसीबी) – रस्त्याने पायी जात असताना अंगावर कुत्रे आल्याने महिलेने जाब विचारला असता महिलेशी गैरवर्तन करत महिलेचा विनयभंग केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.5) चिखली येथे घडला.

महिलेने याप्रकरणी चिखली पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे त्यानुसार सिंग निवृत्ती नरोटे (वय 36 रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या मुलीसह शतपावली करत होता यावेळी एक इसम कुत्रा घेऊन आला. त्याचा कुत्रा अचानक अंगावर आल्याने फिर्यादी म्हणाल्या की, तुमचा कुत्रा मला चावला असता तर यावेळी आरोपी तेथे आला व त्याने फिर्यादींशी अश्लिल भाषेत बोलून धक्का दिला. तसेच तुला व तुझ्या नवऱ्याला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.