अँड. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळे अॅड.गुणरत्न सदावर्ते यांची सनद रद्द

0
220

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – मराठा आरक्षणाला न्यायालयात केले ला विरोध असो की सध्या सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन. अॅड. गुणरत्न सदावर्तेंची चर्चा नेहमीच माध्यमात असते. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द झाली आहे. अँड. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळे ही सनद रद्द झाली आहे. त्यांनी मागच्यावर्षी बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रला तक्रार केली होती. वकीली करतानाच्या नियमांचं उल्लघंन सदावर्ते यांनी अनेकदा केलं. एसटी आंदोलनात त्यांनी वकीलांचा ड्रेस परिधान करून आझाद मैदानात नाच केला होता. त्यानंतर त्यांनी एक बैठक बोलवूनही बार काऊंसिल ऑफ इंडियाच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं असं या तक्रारीत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर वर्षभराने याचा निकाल बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रने दिला आहे. सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली आहे.

मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. पाटील यांच्या बाजूने सदावर्ते न्यायालयात बाजू मांडत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उडी घेत एसटी कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी सदावर्ते दाखल झाले होते. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनचे सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देत असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच एसटी कर्मचाऱ्यांना हे आंदोलन पुढे चालू ठेवायचं असेल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत असं देखील त्यांनी म्हटलं होतं.

पडळकर आणि खोत यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी अॅड. गुणवरत्न सदावर्ते हे विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम होते. “गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना एसटी महामंडळाचा कर्मचारी या आंदोलनातून आझाद करत आहे. या दोघांनी स्थगिती देऊन टाकली. आम्ही या स्थगितीला नाकारत आहोत,” असं सदावर्ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.

अॅड. गुणरत्न सदावर्ते कोण आहेत?
गेल्या काही वर्षांपासून अॅड गुणवरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेला कायदेशीर लढा असो की सध्या सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी घेतलेली उडी असो. सदावर्ते यांनी अशा अनेक केसेस न्यायालयात लढल्या आहेत.

अॅड. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण ओरंगाबाद आणि मुंबईतून झालं आहे. विविध सामाजिक चळवळींमध्ये ते नेहमीच पुढे असायचे. त्यांनी नांदेडला ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ ही संघटना सुरू करुन या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले होते.

मराठा आरक्षणाला शेवटपर्यंत विरोध करत राहणार – सदावर्ते
मराठा आरक्षणाला शेवटपर्यंत विरोध करत राहणार असल्याचे सदावर्ते यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.”मराठा आरक्षणासाठी 52 मोर्चे निघाले. या मोर्चांमध्ये कुठेही वेदना नव्हत्या. हे मोर्चे साखर कारखान्यातले लोक, राजकीय लोकांच्या मदतीने काढलेले होते. त्यामुळे सुप्रिम कोर्टाचा निर्णय योग्य आहे आणि आमचा विजय आहे. जातीच्या विरुद्ध घाणेरड्या राजकारणाचा आज पराभव झाला आहे,” असं देखील या मुलाखतीत सदावर्ते म्हणाले होते.

महाराष्ट्रातील हा पहिलाच निकाल – अॅड.सुशिल मंचरकर
अॅड. सुशिल मंचरकर बार कौन्सिलचे नियम असतात. त्यात सार्वजनिक ठिकाणी गाऊन घालता येत नाही, त्यांनी आझाद मैदानात घातला होता. डान्स केला होता, ते वकिलीली शोभणारे नव्हते. नियम ७ चे उल्लंघन होते. तीन सदस्य समितीने त्यांची सनद रद्द केली. महाराष्ट्रात दोन लाख वकिल आहेत, त्यांच्यासाठी हा निकाल महत्वाचा आहे. आजवर अशा प्रकारे गाऊन असताना चुकिचे वर्तन केल्याचा हा पहिलाच निकाल आहे.