हातचलाखीने महिलेची सोनसाखळी पळवली

0
483

दापोडी, दि. १६ (पीसीबी) -पुढे वृद्ध महिलेवर वार झाले असून तुम्ही तुमच्याकडील सोन्याचे दागिने काढून ठेवा, असे सांगत एका दुचाकीस्वाराने महिलेकडील सोनसाखळी हातचलाखी करून पळवली. ही घटना बुधवारी (दि. १५) सकाळी सव्वा नऊ वाजता जुना पुणे मुंबई महामार्गावर दापोडी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दापोडी येथून जात असताना त्यांच्या समोरून एका दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने सांगितले की, पुढे वयस्कर महिलेवर वार झाला आहे. तिचे सर्व सोने लुटून नेले आहे. तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून ठेवा. फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीने फिर्यादीची सोन्याची साखळी पिशवीत ठेवण्याचा बहाणा केला. हातचलाखी करून आरोपीने ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी फसवणूक करून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.