सुपरवायजरकडे तक्रार केल्याच्या रागातून सहकाऱ्यावर जिवघेणा हल्ला

0
286

निघोजे , दि. २५ (पीसीबी) – कंपनीमध्ये कामावर झोपल्याचा फोटो सुपरवायजरकडे पाठवला म्हणून तिघांनी लाकडी दांडके व चाकूने वार करत 18 वर्षी सहकारी तरुणावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. 23) निघोजे येथे घडली.

बरकत अली मोहम्मदअली शहा (वय 18, रा. निघोजे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंद्रजीत सगर व इतर दोन इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोबत काम करणारा इंद्रजीत हा कंपनीत कामावर झोपला होता. त्याचा फोटो काढून फिर्यादीने सुपरवायजरला पाठवला. याचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या साथीदाराच्या साथीने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीचा पाठलाग करून चाकूने पाठीवर, कंबरेवर वार करून गंभीर जखमी केले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.