सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगत १२ लाखांची फसवणूक

0
76

बावधन, दि. 25 (पीसीबी) : सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगत एका नागरिकाची 12 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मंगळवार (दि. 22) ते गुरूवार (दि. 24) या कालावधीत सेफ्टेक्नो सर्व्हिसेस कंपनी बावधन याठिकाणी घडली.

याप्रकरणी सुहास अशोकराव वानखडे (वय 40, रा. बावधन) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विनोद आण्णाप्पा थोरवत (वय 39, रा. गिजवणे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बावधन येथे सेफ्टेक्नो सर्व्हिसेस कंपनी आहे. संशयित आरोपीने तिथे येत त्यांना सीबीआयमधून आलो असल्याचे सांगितले. तसेच सीबीआयचे बनावट ओळखपत्र दाखवले. सीबीआयचा अधिकारी असून तुमची फाईल माझ्याकडे तपासणीसाठी आली असल्याची खोटी माहिती सांगितली. कंपनीची फाईल चौकशीसाठी असल्याची धमकी देत फिर्यादी यांच्याकडून 12 लाख रुपयांची मागणी केली. ते पैसे घेत तोतया सीबीआय अधिकाऱ्याने पोबारा केला. बावधन पोलीस तपास करीत आहेत.