श्रीलंकेतील अशोक वाटिका येथील ऐतिहासिक सीता अम्मन मंदिरात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत कुंभाभिषेक सोहळा पार पडला.

0
263

२० मे २०२४, बेंगळुरू: श्रीलंका सरकारच्या निमंत्रणावरून, शांतीचे जागतिक राजदूत आणि मानवतावादी नेते, गुरुदेव श्री श्री रविशंकर हे तिथल्या अशोक वाटिका येथील सीता इलिया या गावातील सीता अम्मन मंदिराच्या ऐतिहासिक अभिषेक आणि कुंभाभिषेक समारंभात सहभागी झाले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंधांचे महत्त्व दर्शविणारे हे मंदिर आहे. या सोहळ्याला भारत, नेपाळ आणि श्रीलंका येथील भाविकांची उपस्थिती होती.

गुरुदेव म्हणाले, “माता सीता ही करुणा, मातृत्व आणि सहनशिलतेचे मूर्त स्वरूप आहे.

या विशेष प्रसंगी अयोध्येतून शरयू नदीचे पवित्र पाणी आणण्यात आले. हनुमंताने माता सीतेचे पहिले दर्शन याच ठिकाणी केले होते, ज्यामुळे प्रभू रामाशी त्यांची पुनर्भेट होण्याची आशा जागृत झाली होती. गुरुदेवांनी नेपाळमधील जनकपूर (माता सीतेचे जन्मस्थान), अयोध्या (भगवान रामाचे जन्मस्थान) आणि सध्याच्या कर्नाटकातील किष्किंदा (भगवान हनुमानाचे जन्मस्थान) येथून भेटवस्तू आणल्या आणि आशीर्वाद दिले.

यावेळी संबोधताना गुरुदेव म्हणाले, “यामुळे आपल्या संस्कृतींमधील प्राचीन संबंधांना पुष्टी मिळते. आपल्याला नष्ट होत असलेली मूल्ये परत आणण्याची गरज आहे. रामराज्य हा असा समाज आहे जिथे आपण आपले जीवन निसर्ग नियमांनुसार, सुसंवाद साधत समृद्धीने आणि आनंदाने जगतो. हे ठिकाण जगभरातील महिलांमध्ये दु:खमुक्त, न्यायी आणि समृद्ध समाजाच्या जीवनाची आशा जागवेल.”

गुरूदेवांना ॲम्बेसेडर फोरम द्वारे “जागतिक शांतता आणि मानवतेच्या समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी आपले जीवन समर्पित करत हेच ध्येय असणारे” यासाठी आजीवन पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. गुरुदेवांच्या भेटीमुळे “श्रीलंकेतल्या जनतेला आव्हानात्मक काळात योग्य मार्ग काढण्यासाठी धैर्य आणि सामर्थ्य मिळते” असा उल्लेख देखील या उद्धरणात आहे.

संरक्षण राज्यमंत्री माननीय
प्रेमिथा बंदारा तेन्नाकून यांचे हस्ते १८ मे रोजी बंदारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुदेव यांचे स्वागत करण्यात आले. श्रीलंकेचे पंतप्रधान, माननीय श्री दिनेश गुणवर्धने यांच्या मैत्रीपूर्ण निमंत्रणावरून गुरुदेव तीन दिवसांसाठी या देशाच्या दौऱ्यावर होते.

गुरुदेवांनी देशभरातील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या १२ कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटनही केले. पाच हजारहून अधिक तरुणांना वेगवेगळी कौशल्ये शिकवत सक्षम करून त्यांना नोकरीसाठी तयार करण्याचे या केंद्रांचे उद्दिष्ट आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंग आणि श्रीलंकेतील तंत्रशिक्षण आणि प्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता आणि नेतृत्व अभ्यासक्रम आणि प्राध्यापकांना शिक्षक-प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार केला. याव्यतिरिक्त, बंगलोरस्थित श्री श्री कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सायन्स अँड रिसर्चने संशोधन आणि नवकल्पना यांवर सहयोग करण्यासाठी गम्पाहा विक्रमराच्ची विद्यापीठ (देशातील योगाची पदवी देणारे एकमेव विद्यापीठ) सह सामंजस्य करार केला.