श्रीमंत भगवान जोगदंड आरक्षणाचा बीड तालुक्यातील आणखी एक बळी

0
162

बीड, दि. १९ (पीसीबी) – बीड तालुक्यातील वानगाव येथील शेतकरी श्रीमंत भगवान जोगदंड (वय-60) यांनी काल पहाटे शेतातील वडाच्या झाडाच्या फांदीला फाशी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली एक मुलगा ज्ञानेश्वर जोगदंड वय वर्ष 19 असून अत्यंत गरीब कुटुंबातील शेतकरी आहेत. घटनास्थळी मंडळ अधिकारी साळुंखे एस.बी व तलाठी राऊत जे.एस यांनी भेट दिली असून तशी दप्तरी नोंद केली आहे. त्यांच्या मृत्यूची तक्रार वाणगावातील गावकऱ्यांनी बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केली आहे. घटनास्थळी त्यांच्या खिशात एक चिट्ठी सापडली असून त्यामध्ये मी आरक्षणास चा कोणताही ठोस निर्णय लागत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एक मराठा लाख मराठा असे ही लिहिले होते.तशी चिट्ठी पोलीसांना मिळाली आहे. काल ओबीसी समाजाची अंबड येथे जाहीर सभा झाली त्या सभेमधील नेत्यांनी प्रक्षोभक केले त्या भाषणाचा व्हिडीओ ऐकून आरक्षण भेटणार नाही अशी त्यांंची धारणा झाली व श्री मनोज जरांगे पाटील व मराठा समाजावर जाहरी टीका केली त्या सभेच्या नैराश्यातुन त्यांनी गावातील काही निवडक लोकांकडे आत्महत्या करणार असल्याचे श्रीमंत जोगदंड यांनी बोलूनही दाखवले होते. नागरिकांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी वडीलधारी मंडळीचे त्यांनी ऐकूनही घेतले परंतु रात्री घरातील सर्व सदस्य झोपी गेल्यानंतर घरातून न सांगता निघून गेले व पहाटेच्या वेळेला शेतातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, अजून किती दिवस लोकांचा राज्य शासनात बळी घेणार? असा उद्वीग्न प्रश्न मराठा समाजाबरोबरच ग्रामस्थ ही करत आहेत.