शिवराज जोडवेज आयोजित स्वराज्य मित्र मंडळ नियोजित स्वराज्य करंडक 2024 पर्व तिसरे याचा बक्षीस समारंभ संपन्न

0
168

मावळ, दि १ एप्रिल (पीसीबी )- शिवराज रोडवेज यांच्या माध्यमातून वडगाव शहरांमध्ये भव्य फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शनिवार ३० एप्रिल व रविवार ३१ एप्रिल या दोन दिवशी करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकूण सहा संघमालकांनी आपली संघमालकी जाहीर केली होती यामध्ये प्रशांत भाऊ, म्हाळस्कर, दत्ताजी कुडे, सागर ढोरे, गणेश वायकर, अतिष ढोरे, बजरंग ढोरे या संघमालकांचा समावेश होता तसेच यास्पर्धेत शंभर खेळाडूंनी सहभाग घेतला होता यातील 72 खेळाडूंची निवड ही लिलाव पद्धतीने करण्यात आली होती.

स्पर्धेला एकूण पन्नास हजार रुपये रोख पारितोषिक व इतर वैयक्तिक बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला यात प्रामुख्याने मॅन ऑफ द सिरीज साठी रोहित गिरमे यांस कडून सायकल, बेस्ट बॅटर साठी हर्षल ढोरे यांस कडून बॅट व बेस्ट बॉलर साठी शैलेश वहिले यांस कडून शूज व सर्व सामन्यात सामनावीरांसाठी आकर्षक ट्रॉफी ठेवण्यात आली होती. सर्व खेळाडूंसाठी दोन दिवस सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती व दुपारच्या सत्रामध्ये लिंबू सरबताचे व्यवस्था सोन्या भाऊ मोरे यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये प्रशांत भाऊ म्हाळस्कर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर सागर सागर भाऊ ढोरे स्पोर्ट फाउंडेशन या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या १६ वर्षाखालील संघात विशेष प्राविण्य मिळवल्या बद्दल कु. वैष्णवी सतीश म्हाळस्कर हीचा विशेष सत्कार करण्यात आला. बक्षीस समारंभाच्या वेळी उपस्थित मान्यवर वडगाव नगरीचे मा. प्रथम नगराध्यक्ष मयूर दादा ढोरे, मावळ पंचायत समितीचे मा. सभापती गुलाब काका म्हाळस्कर मा. नगरसेवक किरण म्हाळस्कर, मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेशजी म्हाळस्कर, दत्ता कुडे, अविनाश म्हाळस्कर, अतुल ढोरे, अतिष ढोरे, बजरंग ढोरे, सागर ढोरे, गणेश वायकर, प्रवीण रेड्डी, सतीश पालव, नामदेव घूले, संजय वाघवले, मच्छिंद्र गाडे, पवन दंडेल, नवनाथ भोसले, देवेंद्र आंबेकर, विजय आंबेकर, आकाश वारुळे, लखन आंबेकर, राजाभाऊ म्हाळस्कर, विशाल ठोंबरे,महेश ठोंबरे, प्रतीक भोसले, पियुष भोसले, भावेश ठोंबरे, कृतिक भिसे, प्रशांत जाचक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश ठाकूर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार अमोल ठोंबरे यांनी मानले व सर्व खेळाडूंच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या यात प्रामुख्याने नियोजित डेव्हलपमेंट प्लॅन मधे सध्याच्या ग्राउंड वरती आरक्षण टाकावे, ग्राउंड वरती लाईट कनेक्शन मिळावे, ग्राउंड डेव्हलपमेंट साठी नगरपंचायत कडून अर्थसंकलपात भरघोस निधी मिळावा. ग्राउंड डेव्हलपमेंटचा मुद्दा राजकीय पक्षांच्या जाहीर नाम्यात घेऊन ही मागणी पूर्ण करावी.