नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे स्पोर्ट अकॅडमी यांच्या सौजन्याने चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरशेठ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती क्रीडांगण याठिकाणी “ओपन रोलर स्केटिंग स्पर्धा-२०२५” चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार श्री शंकरशेठ जगताप यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या वयोगट ५ वर्षे ते १४ वर्ष वयोगटातील ५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत ड्रीम क्लब, शिशा स्केटिंग क्लब, LJ स्केटिंग क्लब, साई स्केटिंग क्लब आणि वर्ल्ड पीस स्कुल आळंदी यांनी अनुक्रमे पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा क्रमांक पटकविल्या बद्दल चषक तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आपले शरीर लवचिक राहण्यासाठी अनेक खेळ खेळले जातात. त्यापैकीच एक खेळ म्हणजे स्केटिंग. मुलांमध्ये अगदी लहानपणापासूनच स्केटिंगचे आकर्षण असते. पायाला चाकं लावून भन्नाट वेगाने पुढे जाणे असे त्यांना वाटत असते. पण, त्याचेही एक शास्त्र आहे, काही नियम आहेत हे त्यांना माहित नसते. रोलर स्केटिंग हा चपळतेने व कौशल्यपूर्ण खेळला जातो. शरीराची लवचिकता वाढविणारा हा खेळ आहे. यामध्ये मान, हात, पाय लवचिक होतात. त्यामुळे शरीराचा सर्वांग व्यायाम होतो.
स्केटिंग केल्यास शरीरातील सर्व स्नायू बळकट होतात, शक्ती वाढते. धावण्यापेक्षा स्केटिंग केल्यास शरीराच्या हाडातील जाइंट्सवरील ताण कमी होतो.नियमित सरावामुळे गुडघे व पायाची हाडे मजबूत होतात. पोटाचा व पाठीचा व्यायाम होतो. स्केटिंग सराव करणाऱ्याचा दिवस आनंदित व चेतनाक्षम राहतो. संधिवात तसेच अन्य आजार असलेला व्यक्तीही स्केटिंगमुळे निरोगी व प्रफुल्लित होते.
या वेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपले विचार व्यक्त केले आणि संगितले की “स्केटिंग ही केवळ एक आनंददायी क्रिया नाही तर त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीतील व्यायाम म्हणून स्केटिंगमध्ये सहभागी होणे तुम्हाला सक्रिय राहण्यास आणि तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करू शकते. एकंदरीत, स्केटिंगमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती आणि स्नायूंची ताकद सुधारण्यापासून ते संतुलन, लवचिकता आणि मानसिक आरोग्य सुधारण्या पर्यंत अनेक आरोग्य फायदे मिळतात तथापि, स्केटिंग करताना सुरक्षितता महत्त्वाची असते. संरक्षक उपकरणे घालणे आणि स्केटिंग रिंकचे नियम आणि कायदे पाळणे महत्त्वाचे बनते.”
यावेळी भाजप जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापु) काटे,श्री भानुदास काटे पाटील,श्री मनोज ब्राह्मणकर, श्री राजेश पाटील,सौ. सुप्रिया पाटील,श्री अशोक वारकर काका,श्री प्रविण कुंजीर,श्री बाळकृष्ण परघळे,श्री संभाजी मगर, श्री दिपक गांगुर्डे,श्री शंतनू प्रभुणे,श्री सुशील भाटिया, श्री नितेश जगताप, श्री संकेत चोंधे,श्री सनी बारणे,श्री प्रसाद कस्पटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सागर बिरारी यांनी केले.












































