विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

0
171

भोसरी, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) – तरुणी अज्ञात असल्याचा गैरफायदा घेत एका तरुणाने तिचा विनयभंग केला. ही घटना नोव्हेंबर 2019 ते 28 जुलै 2024 या कालावधीत भोसरी येथे घडली.याबाबत 22 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि. 5) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल चंद्रकांत जाधव (वय 27, रा. खामकरवाडी, अंबरनाथ, जि. ठाणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी अल्पवयीन असताना ओळखीचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी संपर्क साधला. मी जीव देईल, अशी धमकी तरुणीला देत तिच्याशी शाररीक लगट केली. फिर्यादी तरुणी तिथे जाईल तिथे तिचा पाठलाग केला. तिच्यासोबत फोटोही काढले. तू मला भेटली नाही तर सदरचे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली. तरुणीने भेटण्यास नकार दिल्याने तिचे फोटो व्हॉटस्अ‍ॅप व इतर सोशल मिडियावर व्हायरल करीत पिडित तरुणीची बदनामी केली. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.