धक्कादायक…! खून करण्यापूर्वी आठ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड

0
519

वाकड,दि. २५ (पीसीबी) – वाकड येथे राहत्या घराजवळून शनिवारी (दि. 24) आठ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला. त्याचा मृतदेह रविवारी वाकड परिसरात आढळून आला. यामध्ये घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सलेमान राधेश्याम बरडे (वय 8, रा. पिंकसिटी रोड, वाकड) असे मृतदेह आढळलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी सहा ते आठ वाजताच्या कालावधीत सलेमान हा राहत्या घराजवळून बेपत्ता झाला. त्याच्या पालकांनी त्याचा परिसरात शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेते या प्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आणि मुलाचा शोध सुरू केला.

मात्र दुर्दैवाने रविवारी सलेमान याचा वाकड परिसरात मृतदेह आढळून आला. सलेमान याचा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.