वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण

0
109
crime

पिंपरी, दि. ०३ (पीसीबी)

मागील वर्षी नवरात्रीमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 1) संतोषी माता चौक नेहरूनगर पिंपरी येथे घडली.

नितीन नारायण शिंगाडे (वय 43, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुजल बनपट्टे (वय 20, रा. निगडी), रोहित जाधव (वय 28, रा. पिंपळे गुरव), अक्षय शिंदे (वय 26, रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन हे त्यांचे काम आटपून घरी जात होते. संतोषी माता चौक नेहरूनगर येथे आल्यानंतर आरोपींनी नितीन यांना अडवले. मागील वर्षी नवरात्रीमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.