दि . २१ ( पीसीबी ) – सोन्याचा दर जीएसटीसह एक लाखांवर पोहचला आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचा दर वाढल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. एक तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 99 हजार 500 रुपयांवर गेलाय. यामध्ये जीएसटीसह रकमेचा समावेश केल्यास ग्राहकांना एक तोळा सोन्यासाठी 1 लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणारेत.
येत्या 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. यादिवशी सोन्याचा भाव एक लाखांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज होता. मात्र, त्यापूर्वीच सोन्याच्या भावाने लाखाचा टप्पा पार केलाय. त्यामुळे आता सोने खरेदी ही सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेल्याचं दिसते.
जानेवारी महिन्यापासून सोन्याच्या दरात चढ उतार होत आहे. 1 जानेवारी 2025 रोजी, 24 कॅरेट सोन्याचा दर 77,577 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर 31 जानेवारी 2025 रोजी तो 83,107 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला. त्यानंतर आता सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 99,500 इतका झाला आहे.