रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला दुचाकीची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

0
311

मिंडेवाडी, दि. १७ (पीसीबी) – रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १५) नवलाख उंबरे मिंडेवाडी येथे घडली.

दत्ता गंगाराम खरात (वय ३३), लहू भरत बगाड (वय २२, दोघे रा. राशिर देता, ता. मावळ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रमेश कोंडीबा खरात (वय २५, रा. राशिर देता, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकुटकुमार साधुसरन शर्मा (वय ४०, रा. पश्चिम बंगाल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता आणि लहू हे त्यांच्या दुचाकीवरून नवलाख उंब्रे ते शिंदे वासुली इ एमआयडीसी रोडने जात होते. मिंडेवाडी येथे रस्त्याच्या बाजूला शर्मा याने त्याच्या ताब्यातील ट्रक पार्क केला होता. त्या ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकली. त्यात दत्ता आणि लहू हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शर्मा याला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.