मावळात आमदार सुनील शेळकेंच्या गळाला काँग्रेसचा नेता

0
135

पुणे, दि. ४ (पीसीबी) – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघात मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच पुण्यातील मावळ मतदारसंघात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी आपल्या मतदारसंघात काँग्रेसचा नेत्याला आपल्या पक्षात घेण्यास यश मिळवलं आहे. काँग्रेस पक्षाचे माजी मावळ तालुकाध्यक्ष व माजी पुणे जिल्हा सरचिटणीस डॉ. किरण शंकरराव गायकवाड यांनी त्यांच्या पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांना ईमेलद्वारे गायकवाड यांनी राजीनामा पाठवला आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे कारण त्यांनी सांगितले आहे. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

डॉ. किरण शंकरराव गायकवाड हे सुनील शेळके यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे मावळमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. अशातच आगामी निवडणुकीत याचा फायदा शेळकेंना होणार असल्याची शक्यता आहे.

किरण गायकवाड कोण आहेत?
गायकवाड कुटुंब हे सुरुवातीपासूनच काँग्रेससोबत राहिलेलं आहे. किरण गायकवाड पक्षाचे एकनिष्ठ नेते होते. गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणामध्ये सक्रिय दिसत नव्हते. किरण गायकवाड यांनी मावळ विधानसभा निवडणूक देखील लढवली आहे. डॉ. किरण गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात आजवर नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया चे शहराध्यक्षपद, मावळ तालुका युवक अध्यक्ष पद, तालुका अध्यक्षपद, जिल्हा सरचिटणीस पद अशा आदी जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या आहेत. 2014 साली त्यांनी काँग्रेस पक्षाकडून मावळ विधानसभा निवडणूक देखील