माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन

0
181

हिंगोली, दि. १९ (पीसीबी): राज्याच्या माजी आरोग्य, समाजकल्याण राज्यमंत्री, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ॲड. रजनी शंकरराव सातव (वय ७५) यांचे रविवारी सायंकाळी अल्पशा आजाराने नांदेड येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या काँग्रेसचे दिवंगत नेते ॲड. राजीव सातव यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रजनी सातव यांच्या मागे स्नुषा आमदार डॉ. प्रज्ञा सातव, दोन नातवंडे असा परिवार आहे. रजनी सातव या १९८० ते ९० कळमनुरीतून विधान सभेत तर १९९४ ते २००० या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेच्या आमदार होत्या. त्या मूळच्या पुण्याच्या होत्या.