महिलांना अश्लील चित्रफीत पाठविणार्‍यावर गुन्‍हा दाखल

0
43

चिखली, दि. 29 (पीसीबी) : दोन महिलांना अश्‍लिल चित्रफीत पाठविणार्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना २० सप्‍टेंबर ते २७ नोव्‍हेंबर या कालावधीत म्‍हेत्रेवस्‍ती, चिखली येथे घडली.

चिखलीतील म्‍हेत्रेवस्‍ती येथे राहणार्‍या ३४ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. २७) याबाबत चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ९५४५४०६८७८ आणि ७५१८२३२०१५ या अनोळखी मोबाइल धारकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, २० सप्‍टेंबर ते २७ नोव्‍हेंबर २०२४ या कालावधीत अज्ञात व्‍यक्‍तीने फिर्यादी व त्‍यांच्‍या मैत्रिणीला अश्‍लिल चित्रफित पाठवून त्‍यांचा विनयभंग केला. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.