महावितरण व देहूरोड कॅन्टो. बोर्डाशी संबंधित प्रश्नांवर खासदार बारणे घेणार शुक्रवारी बैठक

0
74

पिंपरी, दि. ५ – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अर्थात महावितरण तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्याशी संबंधित समस्या, प्रश्न यांचा आढावा घेऊन ते मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे हे उद्या (शुक्रवारी) दोन स्वतंत्र बैठका घेणार आहेत.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या बैठकीस बोर्डाचे सर्व प्रमुख अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन ते सोडवण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत.

वारंवार खंडित होणारा वीजपुरवठ्याने नागरिक हैराण झाले आहेत. या प्रश्नांसह पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी पिंपरी गावात नवमहाराष्ट्र विद्यालय समोरील महावितरणच्या कार्यालयात दुपारी 12 वाजता खासदार बारणे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला महावितरणचे संबंधित वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड व महावितरण यासंदर्भात नागरिकांचे काही प्रश्न अथवा समस्या असतील तर त्यांनी या बैठकीच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले आहे.