मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरे 

0
286

पिंपरी,दि.०२(पीडीबी) – मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्यात आले. यनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर उपनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

आळंदी आणि देहू येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांचे स्मरण करीत इंद्रायणी घाटावर दीप प्रज्ज्वलीत करुन राष्ट्रभक्ती दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच हैदराबाद मुक्तीसंग्रामातील १६ जिल्हयातील पवित्र माती मंगल कलशाचे पूजन करण्यात आले. जुनी सांगवीतील अहिल्याबाई होळकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन भारत माता तिरंगा मोटरसायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज काळेवाडी या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. तिरंगा ध्वजाजवळ १६ पवित्र माती मंगल कलश पूजनासाठी ठेवण्यात आले होते. मराठवाडा भूमिपुत्रांच्यावतीने पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ महाराज यांचे ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम एक यशोगाथा’ यावर व्याख्यान झाले. यावेळी निवृत्त पोलिस महानिर्देशक मकरंद रानडे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, मा.सहाय्यक पोलिस आयुक्त राम मांडूर्गे, हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, मराठवाडा मित्र मंडळ पुणे कॉलेजचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, मराठवाडा जनविकास संघांचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, वामन भरगंडे, सूर्यकांत कुरुलकर ,  प्रकाश इंगोले, नितीन चिलवंत, मराठवाडा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मण कुलकर्णी, आळंदीचे उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, नगरसेवक दिनेश घुले, शिवाजी पाडुळे, अमोल लोंढे, नागेश जाधव, आण्णा जोंगदड, आरोग्य सेवक संघटनेचे उपाध्यक्ष शिवकुमारसिंह बायस उपस्थित होते.

मकरंद रानडे म्हणाले, की मराठवाडा हा गौरवशाली मराठवाडा प्रांत आहे. मराठवाड्याने खूप संघर्षातून स्वातंत्र्य मिळविले आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाला इतिहासात फारसं स्थान मिळालेलं नाही. भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण मराठवाडा पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्यातही पारतंत्र्य काय असते, हे मराठवाडा वासियांनी अनुभवले आहे. त्यामुळे लोकांच्या समोर इतिहास यायला हवा.

अरुण पवार म्हणाले, की गुलामी मानसिकतेतून अनेकजण अद्याप बाहेर पडलेले नाहीत. हिंदू मुस्लिम सामाजिक सलोखा चांगला आहे. मराठवाड्यातील संघटना समन्वयाने काम करीत आहेत, या संघटनांनी ठोस निर्णय घेऊन काम केल्यास येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल. मराठवाड्याचा कायापालट करण्याची क्षमता या संघटनांमध्ये आहे.

या बरोबरच ह.भ.प. आदिनाथ शास्त्री महाराज, ह.भ.प. रेड्डी महाराज, ह.भ.प. शिवाजी पवार महाराज, ह.भ.प. संपतराव बवले पाटील, ह.भ.प. बाबुराव महाराज तांदळे, ह.भ.प. हरिश्चंद्र महाराज जऱ्हाड, ह.भ.प. किरण महाराज गाडेकर, ह.भ.प. पंढरी महाराज सोळंके, ह.भ.प. रवी महाराज सांगुळे, ह.भ.प. हर्षवर्धन महाराज ओढणे, ह.भ.प. निरंजन महाराज सुर्वे, ह.भ.प. सूरज महाराज कुंभार, ह.भ.प. ऋषिकेश महाराज वाडेकर, ह.भ.प. वैभव महाराज आरगडे, ह.भ.प. संतोष महाराज जऱ्हाड, ह.भ.प. संदीप महाराज लोहर, ह.भ.प. नितीन महाराज मोरे, ह.भ.प. अशोक महाराज मोरे, ह.भ.प. जालिंदर महाराज काळोखे, उद्धव सानप, गणेश ढाकणे, विकास आघाव, हनुमंत घुगे, तसेच छावा ब्रिगेडचे सतीश काळे, संभाजी ब्रिगेडचे धनाजी येळकर, दत्तात्रय इंगळे, हरिष जगताप, राजेंद्र जाधव, राहुल सोमवंशी, संगिताताई कोळी, राधा साळुंखे, चंद्रकला बोरदे, डी. एम. कोळी, प्रकाश शिंदे, अनिता पांचाळ, बालाजी पांचाळ, शेखर वाघेरे, सुर्यकांत कुरुलकर, किशोर अटुरेगकर, बाळासाहेब सांळुखे, शंकर तांबे, दिनेश पवार, संतोष भोरे, राजेंद्र गाडेकर, सत्यजीत चौधरी, प्रा. डॉ. प्रविण घटे, किशोर पाटील, आण्णा मोरे, सतिश काळे, प्रा. डॉ. मारुती अवरगंड, डॉ. प्रितीताई काळे, शारदाताई मुंढे, भैरुजी मंडले, प्रकाश हगवणे, डॉ. श्वेता गाडेकर, महेश घोडके, सुभाष भुसाने, अण्णा मोरे, बळीराम माळी, विजय वडमारे, मारुती बानेवार, राहुल सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सरिता शिंदे यांनी, तर आभार दत्तात्रय धोंडगे यांनी मानले.