भुजबळांवर बोलावेत इतकी त्याची लायकी नाही

0
257

सातारा, दि. १८ (पीसीबी) – मराठा आरक्षणाची आपली लढाई यापुढे आपल्यालाच लढावी लागणार आहे. मात्र, भुजबळांला आता मराठा समाजाने किंमत द्यायची गरज नाही. घटनेच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने कायदा पायदळी तुटवणे योग्य नाही. त्यामुळे भुजबळांवर बोलावे इतकी त्याची लायकी नाही, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यातील सभेत मंत्री भुजबळांना लगावला.

मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील गांधी मैदानावर आज मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडली. त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवत मराठा आरक्षणासाठी आता गावागावात साखळी उपोषणाची हाक दिली. तसेच भुजबळांनाही टोले लगावले.जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आपली लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. यापुढे भुजबळांना मराठा समाजाने किंमत द्यायची नाही. घटनेच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने कायदा पायदळी तुडवणे योग्य नाही. मी टप्प्यात आला की वाजवतो. पण, भुजबळांवर बोलावे इतकी त्याची लायकी नाही.

माझे शिक्षण किती यावर सरकार तीन दिवस राबत होते. भुजबळ म्हणतो पाचवी शिकलोय. मुंबईमध्ये तुम्ही कसे जगला हे आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा करून तुम्ही जगलात म्हणून त्यांना बेसन खावे लागले, असा टोलाही श्री. जरांगे पाटील यांनी लगावला.