भारताकडून पेट्रोल आयात करणाऱ्या भूतान देशात पेट्रोल 60 रुपये तर भारतात का नाही ? :- इम्रान शेख

0
42

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरदचंद्र पवार वतीने दुचाकी हातगाडीवर आंदोलन.

दि . १७ ( पीसीबी )- केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने दुचाकी हातगाडीवर ठेवून आंदोलन करण्यात आले.

“वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल” “नही चाहिये अच्छे दिन वापस लाव पुराने दिन” “पेट्रोल डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे” अशा घोषणा युवकांचे वतीने देण्यात आल्या.

यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “2014 पूर्वी कच्चा तेल 140 डॉलर प्रति बॅरल असताना भारतामध्ये 60 रुपये दराने पेट्रोल डिझेल मिळत होते. त्यावेळी दहा पैशांनी पेट्रोल वाढले असता रस्त्यावर उतरणारे भाजप नेते आज मुग गिळून गप्प का आहेत ? आज 2025 साली कच्च तेल 70 रुपये प्रति बॅरल असून पेट्रोल डिझेल 120 रुपये च्या दराने नागरिकांना विकून केंद्र सरकार आणि तेल कंपन्या नफाखोरी करत आहे.भारताकडून तेल आयात करणाऱ्या भूतान या देशात 60 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल मिळत असून आता भारतातील लोकांनी पेट्रोल भरायला भुतान मध्ये जायचं का ? असा खडा सवाल इमरान शेख यांच्याकडून करण्यात आला.

यावेळी बोलताना ज्योती निंबाळकर म्हणाल्या “पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचा परिणाम दैनंदिन जीवनावर होत असून मध्यमवर्गीयांचे पगार 15 वर्षांपूर्वी होते तेवढेच आहेत परंतु महागाई प्रचंड वाढलेली आहे. याचा विचार करून सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमती त्वरित कमी करावे.”

यावेळी अरुण पवार म्हणाले “2014 च्या आधी 70 रुपये असणारे पेट्रोल चाळीस रुपये पर लिटर करू असं म्हणून मोदी सरकार केंद्रात आले परंतु मागील बारा वर्षात पेट्रोल 40 रुपये कमी करण्याऐवजी 40 रुपये वाढवून जनतेची फसवणूक केली आहे”

माजी नगरसेविका प्रियंका ताई बारसे म्हणाल्या “शिक्षण,महागाई,महिला सुरक्षा,रोजगार या सर्व आघाडीवर केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार हे अपयशी ठरला असून याचा आम्ही जाहीर निषेध करतो”

मेघराज लोखंडे म्हणाले “सरकारने सर्व स्तरातून जनतेची लूट लावलेली आहे प्रत्येक गोष्टीवर सेस आणि एक्साईज सरकारच्या वतीने लावले जात असल्याने महागाई वाढत आहे.महागाई वाढवणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो.”

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इमरान शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन घेण्यात आले या आंदोलनास महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर,मा नगरसेविका प्रियंका ताई बारसे,अरुणभाऊ पवार, रजनीकांत गायकवाड, मेघराज लोखंडे ओम शिरसागर,गणेश देवराम,मयूर थोरवे,साहिल वाघमारे दानिश अन्सारी,
प्रशांत जाधव,शाहिद शेख सार्थक बाराते,
सलमान शेख, समाधान अचलखांब,
परवेज शेख,गणेश धावरे कल्पना गाडगे,ताहेरा सय्यद,पुष्पा गोपाळे चेतना मेश्राम, सचिन निंबाळकर,साकिब शेख,सिद्धांत कसबे युवक तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.