भाजपमध्ये प्रवेशाचे कारण सांगताना संग्राम थोपटेंनी केला गौप्यस्फोट

0
40

भोर, दि. २०
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ते येत्या 22 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, पक्षाकडून आपल्याला डावलण्यात आल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

कार्यकर्त्यांचं म्हणण आहे की तुम्ही गेले अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत आहात, आणि हे काम करत असताना सातत्यानं तुम्हाला पक्षाच्या माध्यमातून डावलण्यात आलं. शेवटी जनतेनं तुम्हाला मतदारसंघात तीन वेळा संधी दिली. तुम्ही जरी मतदारसंघात विकास कामं केली असली तरी सुद्धा अजूनही विकासाला गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षात जावं लागेल, त्या पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे.
देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. म्हणून कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, की जर मतदार संघात विकास कामांना गती द्यायची असेल तर भाजपमध्ये प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. माझी वैयक्तिक भूमिका मी सुरुवातीलाच स्पष्ट केली होती, की कार्यकर्त्यांशी बोलून मी माझा निर्णय घेईल. आता सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, मी भाजपमध्ये प्रवेश करावा. येत्या 22 तारखेला माझा पक्षप्रवेश होईल. या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण उपस्थित असतील, असं थोपटे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसनेच माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ आणली. 2009 साली मी पहिल्यांदा या मतदारसंघातून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो. पक्षानं मला उमेदवारी दिली. जनतेनं मला कौल दिला म्हणून मी निवडून आलो. तेव्हा मी नवीन होतो. नवीन लोकप्रतिनिधी म्हणून मी विधानसभेत काम कोलं. 20o14 ला मी पुन्हा निवडून आलो. तेव्हा राज्यात विरोधी पक्षाचं सरकार होतं, 2019 मध्ये मला पुन्हा संधी मिळली, त्यावेळी कोणालाही वाटत नव्हतं की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, अचानक तीन्ही पक्षाची युती झाली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. काँग्रेसच्या वाट्याला बारा मंत्रिपदं आली. पुणे जिल्हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मोठा जिल्हा म्हणून पुण्याला मंत्रिपद मिळेल, आणि मंत्रिपद मिळत असताना विधानसभेतील अनुभव आणि कार्यकाळ पाहाता मला मंत्रि‍पद मिळेल अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. तीथे संधी थोडक्यात हुकली. मी म्हटलं ठीक आहे, पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो. त्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हा मला वाटलं संधी मिळेल, पण तेव्हाही मला संधी मिळाली नाही. एवढं मोठं संविधानिक पद महिनाभर रिक्त राहिलं. विरोधी पक्षनेतेपदावेळी देखील तसंच झालं असं, थोपटे यांनी म्हटलं आहे.