भरधाव दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी

0
186

तळेगाव, दि. १९ (पीसीबी) भरधाव दुचाकीच्या धडकेत एका महिलेच्या हाताला, डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना 24 जानेवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिवेश दशरथ काटकर (रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मारुती मंदिर चौक येथे रस्ता ओलांडत असताना आरोपी दिवेश काटकर हा दुचाकीवरून भरधाव वेगात आला. त्याने रस्ता ओलांडत असलेल्या फिर्यादी यांना जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर दिवेश हा घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.