ब्राह्मण महासंघाचा कार्य विस्तार देशातील वीस राज्यात

0
246

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ या संस्थेची स्थापना पिंपरी चिंचवड या उद्योग नगरीत करण्यात आली. या उद्योग नगरीने स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत हजारो उद्योजक या देशाला दिले आहेत. याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आगामी काळात संस्थेच्या ब्रम्होउद्योग आघाडीच्या माध्यमातून एक लाख छोटे, मध्यम व लघु उद्योजक घडविण्याचे ध्येय ठेवून संस्था त्या दृष्टीने नियोजन करत आहे. संस्थेचा कृषी विभागासह सर्व क्षेत्रात कार्य विस्तार वाढवण्यासाठी नवीन सभासद नोंदणी साठी सर्व न्याति बांधवांनी पुढे आले पाहिजे. दिल्लीत झालेल्या अधिवेशनात ६०० पेक्षा जास्त उद्योजक दोन दिवस उपस्थित होते. त्यांच्याशी विचार विनिमय करून छोटे, मध्यम व लघु उद्योजक घडविण्याचे काम देशभर विस्तारित करण्याचे नियोजन आहे. पुण्यात असे ३२० उद्योजकांचे विविध व्यवसायाचे आऊटलेट्स मागील काळात संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा कार्य विस्तार देशातील वीस राज्यात असून इतर राज्यात देखील संघटन उभे करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केले.

रविवारी निगडी प्राधिकरण येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश कार्यकारिणी बैठक घेण्यात आली. उद्घाटन माजी महापौर आर. एस. कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, उपाध्यक्ष शाम जोशी, प्रदेश कार्याध्यक्ष निखिल लातूरकर, पुष्कराज गोवर्धन, महिला प्रदेशाध्यक्ष वृषालीताई शेकदार, शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, ब्रह्मोद्योग प्रदेश आघाडीचे राजन बुडूख, शहर महिला अध्यक्ष सुषमा वैद्य, मुंबई प्रदेशाध्यक्ष बाबा जोशी, प्रदेश प्रवक्ते संजय सुपेकर, तेजस पाठक,सचिन टापरे,विजय शेकदार, मंदार रेडे आदी उपस्थित होते.

ही बैठक पिंपरी चिंचवड शहर संघटनेने आयोजित केली होती. यावेळी ब्राह्मण समाजातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सारंग विष्णू कुलकर्णी (उद्योजक), आश्लेष कुलकर्णी (इंटरियर डेकोरेटर), पियूष केंडे (सीनियर जनरल मॅनेजर टाटा मोटर्स), अभय कुलकर्णी (असिस्टंट जनरल मॅनेजर टाटा मोटर्स), विवेक इनामदार (एमपीसी न्यूज), माधुरी ओक (सामाजिक कार्यकर्त्या), राजेश पाटील (पिंपरी चिंचवड विद्यापीठ) यांना गौरविण्यात आले.

या बैठकीत संघटना शहर, राज्य व राष्ट्रीय पातळीवर वाढविण्यासाठी, समाज संघटन विस्तारित करण्यासाठी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रदेश वकील आघाडी सरचिटणीस अंतरा देशपांडे, प्रदेश सचिव संजय परळीकर, प्रदेश सदस्य दिलीप जोशी व अनुपमा कुलकर्णी यांची प्रदेश कमिटीवर नियुक्ती करण्यात आली. आयोजनात आनंद देशमुख, शामकांत कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी, भाऊ कुलकर्णी, अतुल इनामदार, ऋजुता कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, सुहास पोफळे, प्रवीण कुरबेट, शशिकांत कुलकर्णी, कार्तिक गोवर्धन, मुकुंद कुलकर्णी, माधव तिखे, श्रीपाद शिरोडकर, वैभव खरे, संदीप कुलकर्णी, अजित देशपांडे, रेणुका कुलकर्णी व इतर कार्यकारिणी सदस्य यांनी सहभाग घेतला होता.

प्रास्ताविक निखिल लातूरकर, तर दिलीप कुलकर्णी यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला. सूत्र संचालन महेश बारसावडे यांनी केले, आभार आनंद देशमुख यांनी मानले.