बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक एकावर गुन्हा दाखल

0
49

तळेगाव, दि. 05 (पीसीबी) : बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (दि. 4) दुपारी एक वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे सोमाटणे खिंडीत करण्यात आली.

सुनील श्रीकृष्ण गटकर (वय 37, रा. तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रीतम सानप यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील गटकर याने त्याच्या कारमधून बेकायदेशीरपणे विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक केली. पोलिसांच्या तपासणीमध्ये कारमध्ये दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी सहा लाख सहा हजार 415 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.