बस प्रवासात वृद्ध व्यक्तीची रोकड लंपास

0
192

पिंपरी, दि. 2 (पीसीबी) –  डांगे चौक ते काळेवाडी फाटा दरम्यान बसने प्रवास करत असताना एका वृद्ध व्यक्तीच्या खिशातून 35 हजार रुपये लंपास करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

देविदास शामराव भोसले (वय 60, रा. ओंकार कॉलनी, श्रीनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले हे सोमवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास डांगे चौक ते काळेवाडी फाटा दरम्यान पीएमटी बस मधून प्रवास करत होते. बस प्रवासात त्यांनी त्यांच्या खिशामध्ये 35 हजार रुपये रोख रक्कम ठेवली होती. अज्ञात व्यक्तीने भोसले यांच्या खिशातून 35 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.