बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
173

आकुर्डी, दि. २१ (पीसीबी) : बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.20) आकुर्डीतील खंडोबामाळ येथे घडला आहे.

साबीर अन्सारी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शहजाद उस्मान अन्सारी (वय 26 रा. थेरगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून बस चालक विष्णूपंत सुदर्शन मित्रगोत्री (वय 43 रा.अक्कलकोट) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, निसार अन्सारी व साबीर अन्सारी हे दुचाकीवरून जात होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील बस हयगयीने चालवून साबीर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात साबीरचा मृत्यू झाला तर निसार अन्सारी यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.