प्राब’ या संस्थेचा ‘एक्सिट पोल’ मध्ये महायुती 151 तर महाविकास आघाडी 121

0
32

– २८८ विधानसभा मतदार संघाचे अंदाजे निकाल

मुंबई, दि. २२ (पीसीबी) :  राज्यात विधासनसभा निवडणूक नुकतीच पार पडली असून 65.11% इतकं मतदान झालं असून 1995 नंतर विधानसभेसाठी झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे. निवडणूक झाल्यानंतर लगेचच ‘एक्सिट पोल’ यायला सुरुवात झाली आहे. अशातच आता पुण्यातील ‘प्राब’ या संस्थेचा ‘एक्सिट पोल’ आला असून यामध्ये महायुती 151 तर महाविकास आघाडी 121 जिंकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

‘प्राब’ संस्थेच्या ‘एक्सिट पोल’नुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

महायुती : 151
भाजपा : 99
शिवसेना : 33
राष्ट्रवादी : 19


महाविकास आघाडी: 121
काँग्रेस : 36
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे: 38
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार: 47


अन्य प्रमुख कोणत्या संस्थांच्या एक्झिट पोलचा काय अंदाज?

मॅट्रिक्सने केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 89 ते 101 शिंदेंच्या शिवसेनेला 37 ते 45 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 17 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेस पक्षाला 39 ते 47 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 35 ते 43 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 21 ते 39 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच इतरांना आठ ते दहा जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

चाणक्य स्ट्रॅटेजीस या संस्थेने केलेल्या एक्झिट पोल नसार भाजपाला नव्वद हुन अधिक जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 80 हून अधिक जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 22 किंवा त्याहून अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाला 63 आणि त्याहून अधिक राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाला 40 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर इतरांना सहा ते आठ जागा मिळतील असं सांगितलं गेलंय