पोलीस कारवाई करत नसल्याने महिलांनी खडकवासला परिसरातील दारुचे अड्डे केले उध्वस्त

0
808

पुणे, दि. ५ (पीसीबी) – खडकवासला परिसरात सुरु असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यांवर पोलिस कारवाई करत नसल्याने काही ग्रामस्त महिलांनी पुढाकार घेत तेथील दारुचे अड्डे उध्वस्त केले.

प्राप्त माहितीनुसार, खडकवासला धरणाजवळ असलेल्या लमाण वस्ती आणि लांडगे वस्ती येथे अनेक दिवसांपासून हे दारू अड्डे होते. येथे सुरू असणाऱ्या गावठी दारूच्या भट्टीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. हे दारूचे अड्डे बंद करण्यात यावे यासाठी स्थानिक महिलांनी पोलिसांना निवेदनही दिले होते, पण कोणतीच कारवाई होत नसल्याने. काही ग्रामस्त महिलांनी पुढाकार घेऊन येथील दारुचे अड्डे उध्वस्त केले आहेत. तसेच तेथील विक्रीसाठी ठेवलेली दारु नष्ट केली आहे.