पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

0
610

रहाटणी, दि.२२ (पीसीबी) – पूर्ववैमनस्यातून तरुणावर चौघांनी जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.20) रहाटणी येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे,

आकाश सोमनाथ गोडेपाटील (वय 27 रा.रहाटणी) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून आदित्य अहिरराव , प्रेम तरडे, प्रतीक माने यांना पोलिसांनी अटक केली आहे तर त्यांचा आणखी एका अनोळखी साथादारावर गुन्हा दाखल केला आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोबत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. तसेच कोयत्याने वार केला. मात्र फिर्यादींनी तो वार चुकवला व ते तोथून पळाले असता आरोपींनी त्याचा पाठलाग करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.