पुण्यातील ज्येष्ठ पत्रकारांना सन्माननिधी मिळवून देणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

0
106

शासनाकडून होत असलेल्या विलंबानंतर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) – ‘‘पुण्यातील ज्या ज्येष्ठ पत्रकारांना राज्य सरकारने मंजूर केलेला सन्माननिधी अद्याप मिळालेला नाही, त्यांना हा सन्माननिधी लवकरात लवकर मिळून दिला जाईल,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

पुण्यातील पूरस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि. ५) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

‘‘राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान निधी दिला जातो. राज्य सरकारने ११ हजार रुपयांचा निधी २० हजार रुपये केला आहे. परंतु, हा पुण्यातील काही ज्येष्ठ पत्रकारांना हा निधी अद्याप मिळालेला नाही. अशा ज्येष्ठ पत्रकारांना राज्य सरकारने हा निधी द्यावी,’’ अशा मागणीचे निवेदन संघाचे पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिले.

याप्रसंगी संघाचे खजिनदार शिवाजी शिंदे, कार्यकारिणी सदस्य अनिल खुडे उपस्थित होते. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना शिंदे म्हणाले,‘‘पुण्यातील ज्येष्ठ पत्रकारांना हा सन्माननिधी लवकरात लवकर कसा मिळेल, हे मी पाहतो. ज्येष्ठ पत्रकारांना हा निधी लवकरच मिळेल.’’