पीएमपी बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

0
96

सांगवी,दि. ०१ (पीसीबी) : पीएमपीएमएल बसच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 29) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास औंध हॉस्पिटल जवळ, बीआरटी मार्गात घडला.

आशा दिवाकर शिरसाट (वय 57, रा. खडकी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अनुज शशिकांत वाकडे (वय 35, रा. खडकी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीएमपीएमएल बस (एमएच 14/एचयु 5997) चालक अब्दुल हसनसाब जलाल (रा. बिबवेवाडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुज यांची आत्या आशा शिरसाट या औंध हॉस्पिटल जवळ बीआरटी मार्ग ओलांडत होत्या. त्यावेळी औंध वाकड या मार्गावरून जाणाऱ्या पीएमपी बसने त्यांना धडक दिली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.