पीएमपीच्‍या धडकेत महिलेचा मृत्‍यू

0
143

दि. ७ ऑगस्ट (पीसीबी) चाकण,
भरधाव वेगातील पीएमपीएमएलच्‍या बसने धडक दिल्‍यामुळे पादचारी महिलेचा मृत्‍यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ६) रात्री पावणे नऊ वाजताच्‍या सुमारास नाणेकरवाडी, चाकण येथे घडली.

आशा सुनील लष्‍कर (वय ३८, रा. बालाजीनगर, मेदनकर वाडी, चाकण) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या महिलेचे नाव आहे. याबाबत त्‍यांचे पती सुनील शंकर लष्‍कर (वय ३९) यांनी चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. मच्‍छिंद्र दत्‍तात्रय सोनार (वय ५२, रा. वाडा रोड, राजगुरूनगर) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीच बस चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजताच्‍या सुमारास फिर्यादी यांची पत्‍नी आशा या बालाजीनगर बस थांब्‍याजवळ रस्‍ता ओलांडत होत्‍या. त्‍यावेळी भरधाव वेगात आलेल्‍या पीएमपीएमएल बस (एमएच १४ एचयू ४७८३) हिने जोरदार धडक दिली. या अपघातात आशा यांचा मृत्‍यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.