पिस्तूल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक

0
157
crime

वाकड, दि. १६ (पीसीबी) : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 14) सायंकाळी पावणे आठ वाजता जास्त सुमारास काळेवाडी येथे करण्यात आली.

विजय राहुल तलवारे (वय 22, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस परिसरात गस्त घालत असताना काळेवाडी येथे त्यांना विजय तलवारे हा दिसला. तो सराईत गुन्हेगार आहे. तो एका गंभीर गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे आरोपी होता. तो गुन्हा घडल्यानंतर पसार झाला होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून जाऊ लागला. वाकड पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. त्याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.